Jagdish Patil
ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचं वयाच्या 86 व्या वर्षी वृद्धापकाळाने पुण्यात निधन झालं.
नारळीकरांनी सोप्या भाषेत विज्ञान समजावून सांगणारी अनेक पुस्तकं लिहिली. विज्ञान आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रात त्यांनी मोठं योगदान दिलं आहे.
वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी त्यांनी गुरुत्वाकर्षणासंबंधीचा सिद्धान्त मांडला. यानंतर एका रात्रीत त्यांचं नाव घरोघरी पोहोचलं होतं.
त्यावेळी देशातील विज्ञानजगताचा चेहरा बनले होते. 1965 मध्ये भारतदर्शन मोहीम काढत नारळीकरांनी ठिकठिकाणी व्याख्यानं दिली.
सरकारकने त्यांच्या कार्याची दखल घेत 1965 मध्ये त्यांना ‘पद्मभूषण’, 2004 मध्ये पद्मविभूषण तर 2010 मध्ये 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आलं.
नारळीकर जागतिक ख्यातीचे शास्त्रज्ञ आणि मराठी विज्ञानकथेला आधुनिक चेहरा देणारे लेखक होते. त्यांनी 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही भुषवलं.
नारळीकरांचा जन्म 19 जुलै 1938 रोजी कोल्हापुरात झाला. त्यांचे वडील विष्णू नारळीकर हे प्रसिद्ध गणितज्ञ आणि वाराणसीतील हिंदू विद्यापिठाच्या गणित शाखेचे प्रमुख होते.
नारळीकरांचा शालेय शिक्षण वाराणसीत झालं. 1957 मध्ये त्यांनी विज्ञानात प्रथम क्रमांक पटकावत पदवी मिळवली. त्यानंतर उच्च शिक्षणासाठी ते केंब्रिजला गेले.
त्यांनी लिहिलेल्या 'यक्षांची देणगी' या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला. तर 'आकाशाशी जडले नाते'ला खूप प्रसिद्धी मिळाली.