Aslam Shanedivan
विज्ञान रत्न पुरस्कार हा भारत सरकारकडून विज्ञान आणि तंत्रज्ञानातील उत्कृष्ट आणि आजीवन योगदानासाठी दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे.
हा पुरस्कार 'राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार' या योजनेचा भाग असून, यामध्ये विज्ञान श्री, विज्ञान युवा आणि विज्ञान टीम यांसारख्या इतर पुरस्कारांचाही समावेश आहे.
दरम्यान केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या या राष्ट्रीय विज्ञान पुरस्काराची शनिवारी घोषणा करण्यात आली.
जो दिवंगत खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांना मरणोत्तर ‘विज्ञान रत्न’ पुरस्कार म्हणून दिला जाणार आहे
विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील जीवनभर केलेल्या योगदानासाठी हा सर्वोच्च वैयक्तिक पुरस्कार आहे.
हा 'राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार' योजनेअंतर्गत दिला जातो, जी पद्म पुरस्कारांप्रमाणेच एक प्रतिष्ठित पुरस्कार योजना आहे.
हा पुरस्कार 2023 मध्ये स्थापित करण्यात आला आणि 2024 मध्ये पहिल्यांदा प्रदान करण्यात आला आहे.