Akshay Sabale
लातूरमध्ये दिवंगत विलास देशमुख सहकारी साखर कारखाना येथे दिवंगत, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं.
यावेळी अभिनेता रितेश देशमुख यानं काका-पुतण्याचं प्रेम कसं असलं पाहिजे याचं ज्वलंत उदाहरण दिलं आहे.
काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो, असं म्हणत रितेशने दिलीपराव देशमुख यांच्यासमोर आपल्या भावना आणि प्रेम व्यक्त केलं.
यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात टोलेबाजी रंगली आहे.
जयंत पाटील म्हणाले, "काँग्रेसचं बरं आहे, तुम्हाला काका-पुतण्याचं नातं धार्जीण दिसत आहे. दिलीपराव देशमुख इतकं उत्तमपणे नेतृत्व करत आहेत."
"पण, दिलीपराव आणि अमित देशमुख, धीरज देशमुख आणि रितेश देशमुख यांच्याबरोबर असलेले संबंध मधूर आहेत."
"शेवटी व्यक्तिगत नातं टिकवताना राजकारणात कुणी कसंही वागलं तर चालतं."
"पण, राजकारणासाठी कुणी व्यक्तिगत नातं तोडण्याची भूमिका कुणी घेता कामा नये," असं जयंत पाटलांनी म्हटलं.
यावर नाना पटोले म्हणाले, "आजच्या राजकारणातील फरक जयंत पाटील यांनी मांडला. त्यांनी काका पुतण्याचं उदाहरण दिलं."
"ज्या कुटुंबात अविश्वास असेल, तिथं काका पुतण्याचं भांडण होणार."
"मात्र, देशमुख कुटुंबात अविश्वास नव्हता. विश्वासच होता. म्हणून देशमुख कुटुंबात एकजूट आहे. हा फरक आहे," असं नाना पटोलेंनी सांगितलं.