सरकारनामा ब्यूरो
राज्याचे माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल हे मुळचे सिंदखेडा येथील आहेत.
बी.कॉम. पदवीधर रावल यांना मराठी, हिंदी आणि इंग्रजीबरोबर अहिराणी भाषेचेही ज्ञान अवगत आहे.
UK मधील कार्डिफ विद्यापीठातून एम.बी.ए. ची पदवी प्राप्त केली.
राज्याचे माजी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी धुळे मतदार संघातून चारवेळा विधानसभा निवडून जिंकली.
रावल हे दोंडाईचा संस्थानच्या राजघराण्याचे वंशज आहेत, आजोबा सहकार महर्षी दादासाहेब रावल हे आमदार होते.
वयाच्या 25 व्या वर्षी त्यांनी राजकारणात पहिले पाऊल टाकले आणि दोंडाई नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले
13 व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य रावल हे सिंदखेडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात.
2013 मध्ये ते भाजपचे राज्य सरचिटणीस होते.
वादांमुळे नेहमी प्रसिद्धीच्या झोतात राहिलेल्या जयकुमार रावल यांची कारकीर्द धडाकेबाज आहे.