सरकारनामा ब्यूरो
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारी धोरणांविरोधात पोस्ट लिहिल्याने अमेझॉनचे संस्थापक आणि सीईओ जेफ बेझोस यांच्यावर भाजप नेत्यांकडून टीका करण्यात येत होती.
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीपैकी एक आणि प्रसिद्ध कंपनी अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकणार आहेत.
ते येत्या २६ जूनला इटलीतील व्हेनिस येथे 500 दशलक्ष डॉलर्स किंमतीच्या आलिशान सुपरयॉटवर लग्न करणार आहेत.
'एक्स्ट्रा नेव्हल आर्किटेक्चर' या वास्तुकलेचा वापर करून खास जेफ बेझोस यांच्या लग्नासाठी डिझाइन केले असून या सुपरयॉटचे नाव कोरू आहे. याच सुपरयॉटवर ते विवाह बंधनात अडकणार आहेत.
जेफ बेझोस यांच्या होणाऱ्या पत्नीचे नाव लॉरेन सांचेझ. त्या एमी पुरस्कार विजेता, पत्रकार आणि पायलट आहेत.
55 वर्षाच्या लॉरेन यांनी अनेक प्रसिद्ध टिव्ही चॅनेलवर अँकर आणि रिपोर्टर म्हणून काम केले आहे.
त्यांनी 2011 आणि 2017 माॅडलिग केले आहे. त्यांचे सोशल मीडियावर त्यांचे 8 लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत.