Roshan More
आज (बुधवार) लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मांडले जाणार आहे. त्या निमित्ताने जाणून घेऊयात वक्फ बोर्डकडे किती संपत्ती आहे?
वक्फ ही कोणतीही चल किंवा अचल संपत्ती असू शकते. जी इस्लाम मानणारी कोणतीही व्यक्त दान करू शकते.
मुस्लिम व्यक्तीकडून दान करण्यात आलेल्या संपत्तीचा मालक कोणीही नसतो. ही संपत्ती अल्लाहची मानली जाते. मात्र, या संपत्तीच्या देखरेखीसाठी वक्फ बोर्डाची निर्मिती केली जाते.
प्रत्येक राज्यात वेगवेगळे वक्फ बोर्ड असू शकतात. साधारणपणे देशभर 30 वक्फ बोर्ड असून बहुतेकांचे मुख्यालय दिल्लीत आहे.
देशात सर्वाधिक जमीन असलेल्यांमध्ये वक्फ बोर्ड तिसऱ्या क्रमांकावर आहे.
भारतात सर्वाधिक 33 लाख एकर जमीन भारतीय रेल्वेकडे त्यानंतर भारतीय सेनेकडे 17 लाख एकर जमीन आहे. त्यानंतर वफ्त बोर्ड तिसऱ्या क्रमांकावर असून त्यांच्याकडे 9.4 लाख एकर जमीन आहे.
वक्फ बोर्डकडे असणाऱ्या 9.4 लाख एकर संपत्तीची किंमती अंदाजे 1.2 लाख कोटी रुपये आहे.
वफ्त 9.4 लाख एकर जमिनीवर 8.7 लाख मालमत्ता आहेत. या मालमत्तांची देखरेख वक्फ बोर्डाकडून केली जाते.