Rajanand More
पंतप्रधान नरेंद्र मोंदीसह भाजपचे अनेक नेते घराणेशाहीवरून काँग्रेस व इतर पक्षांवर जोरदार टीका करतात. पण झारखंड विधानसभा निवडणुकीत भाजपनेही घराणेशाहीचा जणू कहर केला आहे.
माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांच्या पत्नी आहेत. त्यांना पोटका मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. मुंडा हे केंद्रीय मंत्रीही होते.
गीता कोडा जगन्नाथपूर मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार आहे. माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांच्या त्या पत्नी आहेत.
माजी मुख्यमंत्री रघुबर दास यांच्या सून पूणिमा दास जमशेदपूर पूर्व मतदारसंघातील उमेदवार आहेत. त्यांना भाजपने तिकीट दिले आहे.
माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन यांच्या पुत्र बाबूलाल सोरेन यांना घाटशिला मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे. चंपई सोरेनही निवडणूक लढवत आहेत.
भाजपचे आमदार इंद्रजीत महतो यांच्या पत्नी असून त्यांना सिंदरी मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपचे नेते व आमदार संजीव सिंह यांच्या पत्नी असून त्या दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांना झरिया मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.
खासदार टुलू महतो यांचे बंधू शुत्रघ्न महतो यांन बाघमारा विधानसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आले आहे.
भाजपचे खासदार चंद्र प्रकाश चौधरी यांचे बंधू रोशन लाल चौधरी यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे. ते बडगा गांव विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आहेत.