सरकारनामा ब्यूरो
2020 च्या बँच ची IPS अधिकारी असून अनुकृति शर्मा या उत्तर प्रदेश केडरच्या अधिकारी आहेत.
उत्तर प्रदेश मधील संभलच्या त्या IPS अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
राजस्थान मधील आजमेर या गावात त्यांचं बालपण गेलं. त्यांचे आई आणि वडील हे दोघेही शिक्षक असल्याने अभ्यासाचे धडे घरातूनच मिळाले.
अमेरिकेतील ह्यूस्टन राइस यूनिवर्सिटीतून त्यांनी पीएचडी करत असतानांच त्यांना नासा मधून नोकरीची ऑफर आली.पण...
पण त्यांना समाजासाठी काही तरी काम करण्याची इच्छा होती. म्हणून त्या भारतात परतल्या.
म्हणून त्यांनी UPSC परीक्षेची तयारी करायला सुरुवात केली.
UPSC परीक्षेत तीनदा प्रयत्न करूनही त्यांना अपयश आले. मात्र त्यांनी हार मानली नाही आणि चौथ्या प्रयत्नात 355 वा रँक मिळवत उत्तीर्ण झाल्या. त्यांना भारतीय महसूल सेवा (IRS) मध्ये स्थान मिळाले.
त्यांनी पुन्हा पाचव्यांदा प्रयत्न केला आणि यूपीएससी परीक्षेत उत्तीर्ण करत IPS अधिकारी झाल्या.