Hemant Soren Oath Ceremony : सोरेन यांच्या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्यात खास पाहुण्यांची उपस्थिती; पाहा फोटो...

Rajanand More

चौथ्यांदा शपथ

हेमंत सोरेन यांनी झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून गुरूवारी चौथ्यांदा शपथ घेतली. सलग तीनवेळा शपथ घेणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले असल्याने त्यांचा शपथविधी ऐतिहासिक ठरला.

Hemant Soren | Sarkarnama

आई-वडिलांचे आशीर्वाद

शपथविधी सोहळ्याला हेमंत सोरेन यांची वडील शिबू सोरेन आणि आई उपस्थित होते. शपथ घेण्यापूर्वी त्यांनी आई-वडिलांचे आशीर्वाद घेतले.

Hemant Soren Oath Ceremony | Sarkarnama

मल्लिकार्जून खर्गे

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार केला होता. ते सोरेन यांच्या शपथविधीलाही उपस्थित राहिले.

Hemant Soren Oath Ceremony | Sarkarnama

राहुल गांधी

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची उपस्थिती खास ठरली. राहुल यांनी संविधान आणि जातनिहाय जनगणनेवरून प्रचारात रान उठवले होते.

Hemant Soren Oath Ceremony | Sarkarnama

ममता बॅनर्जी

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीने सर्वांचेच लक्ष वेधले. लोकसभा निवडणुकीत त्यांनी बंगालमध्ये एकला चलोचा नारा दिला होता.

Hemant Soren Oath Ceremony | Sarkarnama

अरविंद केजरीवाल

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे सप्तनीक आवर्जून उपस्थित होते. सोरेन यांच्यानंतर ईडीने केजरीवालांना अटक केली होती.

Hemant Soren Oath Ceremony | Sarkarnama

भगवंत मान

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यासह आपचे खासदार राघव चड्ढा आणि खासदार संजय सिंह यांनीही शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावली.

Hemant Soren Oath Ceremony | Sarkarnama

अखिलेश यादव

इंडिया आघाडीतील महत्वाचा पक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांची उपस्थिती लक्षवेधी ठरली. लोकसभा निवडणुकीत त्यांनी यूपीमध्ये भाजपला धूळ चारली होती.

Hemant Soren Oath Ceremony | Sarkarnama

उदयनिधी स्टॅलिन

तमिळनाडूचे उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी पहिल्यांदाच आघाडीच्या एखाद्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावली.

Hemant Soren Oath Ceremony | Sarkarnama

तेजस्वी यादव

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहून हेमंत सोरेन यांना शुभेच्छा दिल्या.

Hemant Soren Oath Ceremony | Sarkarnama

NEXT : विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 'स्ट्राईक रेट' भाजपचा, ठाकरे- पवारांच्या पक्षांचा किती ?

येथे क्लिक करा