सरकारनामा ब्यूरो
2015 च्या बॅचचे आदित्य यांनी 99 व्या रँकसह UPSC परीक्षा उत्तीर्ण केली होती. देशाच्या विकासावर भर देत त्यांनी एक मोठा बदल घडवला.
झारखंडमधील सिंघभूमचे जिल्हा विकास अधिकारी आदित्य रंजन हे आरोग्य सेवा, तसेच शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
आदित्य रंजन यांनी त्यांच्या जिल्ह्यातील अंगणवाडीचे कौतुकास्पद रूपांतर केले आहे.
या अंगणवाडीमध्ये मुलांना उत्तम शिक्षणाबरोबर चांगल्या आरोग्यसेवा, तसेच त्यासाठी लागणारे आहार पोषणही मिळत आहे.
'तितली' या NGOच्या मदतीने महिलांना मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम करण्याचे उद्दिष्ट यशस्वीपणे साध्य केले.
ही केंद्रे मोफत स्वरूपात नियमित आरोग्यसेवा तपासणी, तसेच औषधे देण्यासाठी सुसज्ज आहेत.
शिक्षणाबाबतीत विद्यार्थ्यांसाठी त्यांनी जिल्हा ई-गव्हर्नन्स सोसायटी संगणक प्रशिक्षण उपक्रम सुरू केला.
गणित आणि विज्ञानात रस निर्माण करण्यासाठी त्यांनी ‘वंडर ऑन व्हिल्स’ हा उपक्रमही सुरू केला.