सरकारनामा ब्यूरो
झारखंडच्या धनबाद येथील श्वेता मिश्रा यांनी यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेत चौथ्या प्रयत्नात यश मिळवले.
श्वेता मिश्रा यांनी भारत सरकारच्या गृह मंत्रालयात निरीक्षक म्हणून कार्यरत असताना यूपीएससीची परीक्षा दिली आणि 376 वी रँक मिळवली.
झारखंडच्या प्रतिष्ठित डी नोबिली सीएमआरआय स्कूलमधून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.
दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्री राम कॉलेजमध्ये पदवी शिक्षण घेतले तर त्याच विद्यापीठातून एलएलबी केले.
कायद्यात पदवी घेतल्यानंतर त्यांनी यूपीएससीचा प्रवास सुरू केला. दोन अपयशानंतरही प्रयत्न चालू ठेवत हार नाही मानली.
अखेर चौथ्या प्रयत्नात यश मिळवत आपले स्वप्न पूर्ण केले. भारतीय ऑडिट आणि अकाउंटिंग सर्व्हिस ऑफिसर म्हणून त्यांची नियुक्ती झाली.
मसुरीच्या लाल बहादूर शास्त्री नॅशनल ॲकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये UPSC फाउंडेशन कोर्स प्रशिक्षणादरम्यान त्यांचा फिटनेस प्रवास सुरू झाला.
केवळ धावणे हा आयुष्याचा अनिवार्य भाग बनवत अनेक मॅरेथॉनमध्ये अव्वल स्थान मिळवून त्या उत्कृष्ट कामगिरी करत आहेत.
श्वेता मिश्रा त्यांच्या फिटनेससाठी खास ओळखल्या जातात. दररोज दहा किलोमीटर अंतर धावणाऱ्या या आयएएस सोशल मीडियावर फिटनेस सल्ले शेअर करतात.
R