Ramdas Soren : विधानसभेत 'या' नेत्यावर इंडिया आघाडीची भिस्त; भाजपला शिंगावर घेण्याची ताकद...

Rajanand More

रामदास सोरेन

झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार रामदास सोरेन यांनी शुक्रवारी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांचा पहिल्यांदाच हेमंत सोरेन यांच्या मंत्रिमंडळात समावेश.

Ramdas Soren, Hemant Soren | Sarkarnama

चंपई सोरेन यांचा पर्याय

रामदास सोरेन यांना चंपई सोरेन यांच्या जागी बढती देण्यात आली आहे. तेच चंपईदा यांना टक्कर देतील, असा पक्षाला विश्वास.

Ramdas Soren | Sarkarnama

कोल्हान भागात दबदबा

कोल्हान भागातील घटशिलाचे आमदार असून या भागात चांगलाच दबदबा आहे. चंपई सोरेन यांच्यानंतर रामदास सोरेन यांचेच नाव घेतले जाते.

Ramdas Soren | Sarkarnama

सोरेन विरुध्द सोरेन

चंपई सोरेन भाजपमध्ये गेल्याने कोल्हान भागात जेएमएमचा फटका बसण्याची भीती. त्यामुळे रामदास सोरेन यांना मंत्रिपद देत थेट चंपई यांना सूचक इशारा.

Ramdas Soren | Sarkarnama

केवळ दोनदा आमदार

रामदास सोरेन हे 2009 आणि 2020 च्या निवडणुकीत विजयी झाले आहेत. आदीवासी नेते म्हणून राज्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Ramdas Soren | Sarkarnama

हेमंत सोरेन यांची खेळी

चंपई सोरेन भाजपमध्ये गेल्याने विधानसभा निवडणुकीत भाजपला फायदा होण्याची शक्यता. हे ओळखून रामदास सोरेन यांना मंत्रिपद देण्याची हेमंत सोरेन यांची खेळी.

Ramdas Soren | Sarkarnama

14 जागांवर लढत

कोल्हान भागात विधानसभेच्या 14 जागा आहेत. मागील निवडणुकीत चंपई सोरेन यांच्यामुळे इंडिया आघाडीला 13 जागा मिळाल्या होत्या. आता आघाडीला दणका बसण्याची भीती.

Ramdas Soren | Sarkarnama

हुकमी एक्का

रामदास सोरेन हे चंपई सोरेन यांची उणीव भरून काढतील, अशी आघाडीला आशा. आदीवासी समाजात चांगली पकड असल्याने ते हुकमी एक्का ठरण्याची शक्यता आहे.

Ramdas Soren | Sarkarnama

NEXT : मुस्लिमांचे विवाह आता कायद्याच्या कक्षेत; काय आहे उद्देश

येथे क्लिक करा.