Pradeep Pendhare
आसामचे महसूल आणि आपत्ती व्यवस्थापनमंत्री जोगेन मोहन यांनी विधेयक सादर केले. मुस्लिमांमध्ये काझी विवाह नोंदणी करत. मात्र नव्या कायद्यात सरकारकडून ही नोंदणी होईल.
काझींमार्फत पूर्वी विवाह करण्यात आलेत आणि त्यांची नोंदणी झाली आहेत, ते वैध आहेत. मात्र आता नवे विवाह होतील, ते या कायद्याच्या कक्षेत असणार आहेत.
या विधेयकाचा उद्देश बालविवाह रोखणे तसेच वधू-वर पक्षाच्या संमतीखेरीज विवाहाला प्रतिबंध करणे हा असणार आहे.
नवीन कायद्यांतर्गत आता सरकारकडे विवाह नोंदणी करणे बंधनकारक असणार आहे. मुलींच्या लग्नाचे वय 18 वर्षे, तर मुलांसाठी 21 वर्षे असेल, या कायद्याचे उल्लंघन करता येणार नाही.
बहुपत्नीत्व रोखणे तसेच विवाहित महिलांना त्यांचे हक्क मिळणे तसेच पतीच्या मृत्यूनंतर त्यांना संपत्तीत योग्य वाटा मिळण्याची तरतूद विधेयकात केली आहे.
महिलांच्या सासरघरी राहण्याच्या, विवाहानंतर पत्नीला सोडून देण्याच्या पुरुषांच्या कृतीला या विधेयकामुळे आळा बसेल; तसंच विवाहसंस्था बळकट होईल.
हे विधेयक संमत होणे ऐतिहासिक आहे. बहुपत्नीत्वाला बंदी घालणे हे पुढचे उद्दिष्ट आहे. विधेयकाला पाठिंबा दिल्याबद्दल सर्व आमदारांचे मुख्यमंत्री हेमंत बिस्व सरमा यांनी आभार मानले.