Rajanand More
कल्पना सोरेन राजकारणात सक्रिय नसून बिझनेस वुमन आहेत. एक खासगी शाळाही त्या चालवतात. त्या केवळ निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होतात.
झारखंड मुक्ती मोर्चाच्या एका आमदाराने राजीनामा दिला असून त्या जागी पोटनिवडणूक लढविण्याची शक्यता.
पती हेमंत सोरेन यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. त्यांच्यावर कारवाई झाल्यास कल्पना या मुख्यमंत्री असतील, अशी जोरदार चर्चा...
कल्पना यांचा जन्म रांचीत झाला असला तरी त्यांचे कुटुंब मूळचे ओडिशातील आहे. आई-वडिलांचा बिझनेस असल्याने त्यांचाही राजकारणाशी संबंध नाही.
कल्पना आणि हेमंत सोरेन यांचा विवाह 7 फेब्रुवारी 2006 मध्ये झाला. त्यानंतर त्यांचा राजकारणाशी थेट संबंध आला.
कल्पना यांना दोन मुले असून त्या राजकारणात फारशा रमल्या नाहीत. कुटुंब आणि बिझनेसमध्ये त्यांनी अधिक लक्ष दिले.
मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यामागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. बेहिशेबी संपत्ती, तसेच कोळसा घोटाळ्यात नाव असल्याने अडचणीत.
पती मुख्यमंत्री असले तरी कल्पना राजकारणात सक्रिय नसल्याने मुख्यमंत्री झाल्यास त्या राज्य सांभाळू शकतील का, याबाबत उलटसुलट चर्चा.