सरकारनामा ब्यूरो
जिवाजीराव शिंदे यांचे नातू आणि भारतातील ब्रिटिश राजवटीत ग्वाल्हेर संस्थानाचे शेवटचे नेते माधवराव शिंदे यांचे ते पुत्र आहेत.
ज्योतिरादित्य शिंदे हे काँग्रेसचे माजी नेते माधवराव शिंदे यांचे पुत्र आहेत.
नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात ते नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री म्हणून कार्यरत आहेत.
मध्य प्रदेशचे प्रतिनिधित्व करणारे शिंदे हे राज्यसभेचे खासदार आहेत.
त्यांनी मुंबईच्या कॅम्पियन स्कूल आणि डेहराडूनच्या 'द डून स्कूल' येथून प्राथमिक शिक्षण घेतले.
ज्योतिरादित्य हे हार्वर्ड विद्यापीठाचे पदवीधर आणि स्टँडफोर्ड ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून एमबीए केले आहे.
शिक्षण पूर्ण करुन त्यांनी नामांकित खासगी कंपन्यांमध्ये नोकरी केली.
शिंदे यांनी काँग्रेस पक्षाचा त्याग करुन भाजपमध्ये प्रवेश केला होता.
ज्योतिरादित्य शिंदे हे मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे (MPCA) अध्यक्ष होते. त्यांनी राज्याच्या क्रीडा क्षेत्रात त्यांनी चांगली कामगिरी निभावली आहे.