उपमुख्यमंत्री ते महाराष्ट्राचे राज्यपाल! त्रिपुराच्या राजघराण्यात जन्मलेल्या जिष्णू देव वर्मा यांचा राजकीय प्रवास कसा?

Jagdish Patil

राष्ट्रपती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गुरूवारी (ता.05) देशातील 9 राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती जाहीर केली.

Draupadi Murmu | Sarkarnama

जिष्णू देव वर्मा

त्यानुसार तेलंगणाचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Jishnu Dev Varma | Sarkarnama

माहिती

याच पार्श्वभूमीवर राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या बाबतची माहिती जाणून घेऊया.

Jishnu Dev Varma | Sarkarnama

राजकारणी

त्रिपुराच्या राजघराण्यात जन्मलेले जिष्णू देव वर्मा हे ईशान्य भारतातील अनुभवी राजकारणी म्हणून ओळखले जातात.

Jishnu Dev Varma | Sarkarnama

उपमुख्यमंत्री

2018 ते 2023 या काळात ते त्रिपुराचे उपमुख्यमंत्री होते. ते वित्त, ऊर्जा आणि ग्रामीण विकास खात्यांचेही मंत्रीही होते.

Jishnu Dev Varma | Sarkarnama

जन्म

15 ऑगस्ट 1957 रोजी त्रिपुराची राजधानी अगरतळा येथे त्यांचा जन्म झाला.

Jishnu Dev Varma | Sarkarnama

भाजप

1990 च्या दशकात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 1996, 1998 आणि 1999 साली सालची लोकसभेची निवडणूक त्यांनी लढवली.

Jishnu Dev Varma | Sarkarnama

सत्ता

2018 साली त्रिपुरामध्ये भाजपची सत्ता येताच वर्मा यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली.

Jishnu Dev Varma | Sarkarnama

तेलंगणा

उपमुख्यमंत्रीपद भूषवल्यानंतर त्यांच्याकडे तेलंगणाच्या राज्यपाल पदाची जबाबदारी देण्यात आली होती.

Jishnu Dev Varma | Sarkarnama

लेखक

राजकारणासह त्यांना साहित्य, कला आणि क्रीडा क्षेत्राचीही आवड आहे. ते कवी आणि लेखक म्हणूनही ओळखले जातात.

Jishnu Dev Varma | Sarkarnama

NEXT : आंबेडकरी चळवळीचा वारसा, वडील नगरसेवक अन् आक्रमक वक्त्या : शिंदेसेनेकडून राज्यसभेवर गेलेल्या ज्योती वाघमारेंची हिस्ट्री

Jyoti Waghmare Rajya Sabha | Sarkarnama
क्लिक करा