Jitan Ram Manjhi News : चार आमदार सोबत 'या' नेत्याला मुख्यमंत्री पदाची ऑफर, बिहारच्या राजकारणात खळबळ

Roshan More

मुख्यमंत्री पदाची ऑफर

नितीश कुमार यांनी साथ सोडल्याने लालू प्रसाद यादव यांच्या आरजेडी पक्षाकडून हिंदुस्थान आवामी मोर्चा (हम) पक्षाचे संस्थापक जीतन राम मांझी यांना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे.

jitan ram manjhi | sarkarnama

'हम'चे केवळ चार आमदार

मांझी यांच्या पक्षाचे बिहार विधानसभेत अवघे चार आमदार आहेत.

jitan ram manjhi | sarkarnama

नितीश यांची साथ सोडली

जीतन राम मांझी हे नितीश कुमार यांच्या जेडीयू पक्षात होते. मात्र, त्यांनी नितीश यांची साथ सोडून आपला हिंदुस्थान आवामी मोर्चा हा पक्ष स्थापन केला.

jitan ram manjhi | sarkarnama

बिहारचे माजी मुख्यमंत्री

2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर नितीश कुमार यांनी जीतन राम मांझी यांना मुख्यमंत्री केले होते. मात्र, बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी मांझी यांना हटवून नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री झाले.

jitan ram manjhi | sarkarnama

आकड्यांचा खेळ

जेडीयूचे 45 आमदार आहेत. भाजपकडे 78 आमदार आहेत. आरजेडीचे 79 आमदार आहेत· बहुमतासाठी 122 आमदारांचे समर्थन आवश्यक आहे. त्यामुळे 'हम'चार आमदारांना महत्व आले आहे.

jitan ram manjhi | sarkarnama

1980 मध्ये पहिल्यांदा आमदार

जीतन राम मांझी हे 1980 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. त्यांच्यानंतर पाच वर्षानंतर नितीश कुमार आमदार झाले.

jitan ram manjhi | sarkarnama

मांझींचा नकार

आरजेडीकडून मुख्यमंत्री पदाची ऑफर देण्यात आली असली तरी मांझी यांनी आरजेडीसोबत जाण्यास नकार दिला आहे.

jitan ram manjhi | sarkarnama

निवडणुक न लढण्याची घोषणा

जीतन राम मांझी यांचे वय 79 आहे. त्यामुळे त्यांनी यापूर्वीच आपण कोणतीही निवडणूक लढणार नसल्याचे घोषणा केली होती.

jitan ram manjhi | sarkarnama

NEXT : राज्य सरकारने मनोज जरांगेंच्या कोणत्या मागण्या केल्या मान्य? वाचा एका क्लिकवर

Manoj Jarange Patil | sarkarnama