Pradeep Pendhare
जीतन राम मांझी हे केंद्रातील मोदी 3.0 मंत्रिमंडळातील सर्वात वयस्कर मंत्री आहेत. त्यांच्याकडे केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कारभार आहे.
गयामधील बिहारचे पहिले मुख्यमंत्री आणि पहिले केंद्रीय मंत्री बनण्याचा बहुमान मिळाला. यासाठी जीतन राम मांझी यांनी जनतेचे आभार मानले.
काँग्रेस, जनता दल, आरजेडी आणि जद (यू) च्या तिकिटावर आमदार झाले. हिंदुस्थान अवाम मोर्चा तिकिटावर खासदार म्हणून पहिल्यांदा निवडून आलेत.
बिहारचे त्यांनी 23 वे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले. जीतन राम मांझी हे बिहार राज्यातील दलित समाजाचे तिसरे मुख्यमंत्री ठरले.
मुख्यमंत्री झाल्यानंतर 10 महिन्यांनी पक्षाने त्यांना नितीश कुमार यांच्यासाठी पद सोडण्यास सांगितले. तसे न केल्याने त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली.
बहुमत सिद्ध न झाल्याने 20 फेब्रुवारी 2015 रोजी त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. सध्या ते हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे राष्ट्रीय नेते असून यापूर्वी ते पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते.
जीतन राम मांझी यांचे वडील शेतकरी मजूर होते. शिक्षणानंतर त्यांनी 1966 मध्ये लिपिक म्हणून काम केले. 1980 मध्ये नोकरी सोडली.
जीतन राम मांझी 1980 मध्ये आमदार म्हणून निवडून आले. यानंतर त्यांचा बिहार राज्यात राजकीय प्रवास सुरू झाला. काँग्रेस, जनता दल, आरजेडी आणि जद (यू) अशा पक्षात राजकीय प्रवास झाला.
महायुतीमधील दिग्गज दलित चेहरा असलेले जीतन राम मांझी यांचे वय 79 असून, त्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच लोकसभा निवडणूक जिंकली आहे.