राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर पवारांनी मोठी जबाबदारी सोपवली आहे. .राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी आव्हाडांची नियुक्ती करण्यात आली आहे. .ठाण्यातील मुंब्रा-कळवा मतदारसंघातून ते चारवेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. ते विधान परिषदेवरही होते. .काँग्रेसमधून बाहेर पडत पवारांनी १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. तेव्हापासून आव्हाड पक्षात सक्रिय आहेत. . २०१४ मध्ये महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री, २०१९ मध्ये ते सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री होते.. पवाराचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख आहे. आघाडी सरकारमध्ये ते मंत्रीही होते. . ठाण्याच्या राजकारणात सक्रीय असलेले आव्हाड हे मुळचे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील पास्ता या गावचे आहेत. . वडील सतीश आव्हाड यांनी कुटुंबासह ठाण्यात स्थलांतर केले, गिरणी कामगार म्हणून काम करीत होते. . स्टील उत्पादक कंपनीतही ते कामाला होते. तेथे कामगाराच्या लढ्याचे सतीश आव्हाड यांनी नेतृत्व केले. . ठाम, स्पष्टवक्ते, आणि पुरोगामी विचारसरणीचे राजकारणी आहेत, सामाजिक क्षेत्रातसुद्धा सक्रिय आहेत..NEXT: : दररोज 27 कोटी रुपये दान ! कोण आहेत सर्वात श्रीमंत मुस्लिम उद्योगपती.येथे क्लिक करा