नोकरी कधीही जाऊ शकते? मग या ८ गोष्टी आजच करा, आर्थिक संकटापासून राहाल दूर!

Ganesh Sonawane

अत्यावश्यक खर्चाची यादी करा

घरभाडे, EMI, किराणा, वीज-पाणी, शिक्षण, विमा आणि औषधांचा किमान मासिक खर्च निश्चित करा. नोकरी गेल्यास कोणते खर्च थांबवता येतील, हेही आधीच ठरवा.

Job Loss Planning | Sarkarnama

६ महिन्यांचा आपत्कालीन निधी ठेवा

किमान सहा महिन्यांच्या अत्यावश्यक खर्चाएवढी रक्कम बाजूला ठेवा. नोकरीची अनिश्चितता जास्त असल्यास हा निधी ९ ते १२ महिन्यांचा ठेवा.

Job Loss Planning | Sarkarnama

नवीन कर्ज घेणे टाळा

नोकरीची परिस्थिती अनिश्चित असताना मोठे कर्ज किंवा जास्त EMI घेण्याची घाई करू नका. उत्पन्न बंद झाल्यास कर्जाचा हप्ता आर्थिक ताण वाढवू शकतो.

Job Loss Planning | Sarkarnama

कंपनीच्या विम्यावर अवलंबून राहू नका

नोकरी संपल्यानंतर कंपनीचा आरोग्य विमा मिळेलच असे नाही. त्यामुळे स्वतंत्र आरोग्य विमा असणे महत्त्वाचे आहे.

Job Loss Planning | Sarkarnama

बचत आणि गुंतवणूक सुरू ठेवा

उत्पन्न चांगले असताना अतिरिक्त रक्कम आपत्कालीन निधी आणि महागडे कर्ज फेडण्यासाठी वापरा. दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठी सुरू असलेली बचत शक्य असल्यास कायम ठेवा.

Job Loss Planning | Sarkarnama

उत्पन्नाचा दुसरा पर्याय तयार ठेवा

नोकरीसोबत नवीन कौशल्ये शिकून फ्रीलान्स किंवा इतर उत्पन्नाच्या संधी शोधा. नोकरी गेल्यानंतर पर्याय शोधण्यापेक्षा आधीच तयारी असणे फायदेशीर ठरते.

Job Loss Planning | Sarkarnama

गुंतवणूक घाईने मोडू नका

नोकरी गेल्यावर घाबरून PF किंवा दीर्घकालीन गुंतवणूक चुकीच्या वेळी मोडण्याची घाई करू नका. गरज पडल्यास आर्थिक परिस्थिती पाहूनच निर्णय घ्या.

Job Loss Planning | Sarkarnama

क्रेडिट कार्डचा अतिवापर टाळा

उत्पन्न बंद असताना क्रेडिट कार्डवर खर्च भागवणे टाळा. व्याज आणि थकीत रक्कम वाढल्यास आर्थिक संकट आणखी गंभीर होऊ शकते.

Job Loss Planning | Sarkarnama

NEXT : UPIनं पेमेंट करण्याआधी 'फी अपडेट'बाबत जाणून घ्या! सर्वसामान्यांना फटका बसणार की नाही?

UPI Payment New Rule | Sarkarnama
येथे क्लिक करा