Jogendra Kawade and Mahayuti : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोगेंद्र कवाडेंचा महायुतीला सूचक इशारा!

Mayur Ratnaparkhe

पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे जोगेंद्र कवाडे यांनी विधानसभेसाठी त्यांना हव्या असणाऱ्या जागाचा आकडा सांगितला आहे. 

विधानसभा निवडणुकीत योग्य सन्मान न मिळाल्यास आम्ही 30 जागा लढू, असे जोगेंद्र कवाडे(Jogendra Kawade) यांनी म्हटले आहे.

मंत्रिमंडळाच्या विस्तारात आमच्या वाट्याला दोन मंत्रिपदे पाहिजेत. अशी मागणीही केली आहे.

आम्हाला सत्तेत वाटा हवा आहे, असं जोगेंद्र कवाडे यांनी स्पष्ट केलं आहे. 

आता मंत्रिमंडळाचा विस्तारात एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्रिपद पाहिजे, असं कवाडे म्हणाले आहेत.

मंत्रिपदाव्यतिरिक्त महामंडळात प्रतिनिधित्व हवे आहे, अशी मागणीही कवाडेंनी केली आहे.

आम्ही महायुतीचे घटक आहोत. आता केंद्रात एनडीएचे सरकार आले आहे. असं कवाडे म्हणतात.

या सरकारने शोषित, पीडित, कष्टकरी, शेतकरी यांच्या कल्याणासाठी भरीव कामगिरी करावी, अशी अपेक्षीही कवाडेंनी व्यक्त केली आहे.

लोकसभेच्या निवडणुका आता संपल्या आहेत. निवडणुकांमध्ये लोक एकमेकांचे विरोधक असतात. शत्रू नसतात. असं कवाडे यांनी म्हटलं आहे.

Next : कामामळे लोकाधिकारी म्हणून ओळख