Ravikant Tupkar : भूमिपुत्रांना हवाहवासा वाटणारा भूमिपुत्राचा तरूण चेहरा!

प्रसन्न जकाते

बालपणापासूनच सक्रिय

रविकांत तुपकर यांनी 18 वर्षांचे असतानाच शेतकरी चळवळीत उडी घेतली. शेतकऱ्यांसाठी काहीतरी केले पाहिजे या विचारांनी ते बालपणापासूनच झपाटलेले होते.

Ravikant Tupkar | Sarkarnama

गुरूकडून प्रेरणा

रविकांत तुपकर यांनी शेतकरी नेते स्व. शरद जोशी यांच्या कार्यातून प्रेरणा घेत शेतकरी चळवळीत कामाला सुरुवात केली.

Sharad Joshi | Sarkarnama

दोनशेवर आंदोलनांमध्ये सहभाग

रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत झालेल्या दोनशेवर आंदोलनांमध्ये सहभाग घेतला. त्यांची स्वत:चीच आंदोलने कमीत कमी 50 असावी.

Ravikant Tupkar | Sarkarnama

आत्मदहनाचा प्रयत्न

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तुपकर यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला होता. हे आंदोलन राज्यात चांगलेच गाजले. त्यानंतर शेतकऱ्यांना मदतही मिळाली.

Ravikant Tupkar | Sarkarnama

अन्नत्याग आंदोलन

तुपकरांंनी अनेकदा अन्नत्याग केला आहे. आई व पत्नीलाही तुपकर यांची अवस्था पाहता अश्रू अनावर झालेत. स्वत:ला त्रास करून घेऊ नका, असे त्यांच्यावर प्रेम करणारे त्यांना रागावून सांगतात.

Ravikant Tupkar | Sarkarnama

पश्चिम विदर्भात क्रेझ

पश्चिम विदर्भातील तरुण शेतकऱ्यांमध्ये रविकांत तुपकर नावाची ‘क्रेझ’ आहे. लवकरच ते लोकसभा निवडणुकीसाठी आपले भाग्य आजमावणार आहेत.

Ravikant Tupkar | Sarkarnama

अटकेचा विक्रम

आपल्या आगळ्यावेगळा व आक्रमक आंदोलनांसाठी प्रसिद्ध असलेले रविकांत तुपकर यांना पोलिसांनी आतापर्यंत सुमारे 26 वेळेला अटक केली आहे. मात्र ते शेतकऱ्यांसाठी लढत राहतात.

Ravikant Tupkar | Sarkarnama

‘ये सूरत बदलनी चाहिए..’

कृषी आधारित अर्थव्यवस्था, शेतकऱ्यांचा प्राधान्य आणि गावगाडा वाचविणे हेच आपले ध्येय असून केवळ ‘हंगामा खडा करना मेरा मकसद नहीं..’, असे रविकांत तुपकर सांगतात.

Ravikant Tupkar | Sarkarnama

Next : भारतात अशी सुरू झाली UPSC परीक्षा...

UPSC History | Sarkarnama
येथे क्लिक करा