सरकारनामा ब्यूरो
JSW स्टील ही कंपनी टाटा, मित्तल यांना मागे टाकत जगातील सर्वात मोठी स्टील कंपनी बनली आहे.
BSE मध्ये कंपनीचे मार्केट कॅपिटल 30 अब्ज डॉलरपेक्षा जास्त झाले आहे. कोणाच्या नेतृत्वाखाली ही कंपनी मौल्यवान स्टील कंपन्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पोहचली आहे, हे जाणून घ्या...
कंपनीचे मालक आहेत सज्जन जिंदाल. मंगळवारी बीएसईवर कंपनीच्या शेअरची किंमत 1,074.15 रुपयांवर पोहोचली असून, कंपनीचे मार्केट कॅप 30 अब्ज डॉलरपेक्षा जास्त झाले आहे.
सज्जन जिंदाल हे प्रसिद्ध उद्योजक ओमप्रकाश जिंदाल यांचे सुपूत्र आहेत. वडिलांमुळे लहानपणापासूनच त्यांना या व्यवसायात रस निर्माण झाला.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी 1982 ला वडिलांच्या बिझनेसमध्ये म्हणजेच जिंदाल समूहाचे कामकाज पाहायला सुरूवात केली.
2005 ला वडील ओमप्रकाश यांचा अपघातात मुत्यू झाला, यामुळे आई सावित्री जिंदाल यांच्यासह त्यांनीही बिझनेस पुढे नेण्यात महत्त्वाची भूमिका ब
पुढे जाऊन हाच बिझनेस त्यांच्यासह तिन्ही भावांना दिला. सज्जन यांनी स्टीलचा व्यवसाय पुढे नेत. या कंपनीचा माइनिंग, एनर्जी, स्पोर्ट्स, सॉफ्टवेअरमध्ये विस्तार केला.
सज्जन यांनी 1982 ला 'स्टील प्लांट' म्हणजेच लोखंड आणि पोलाद बनवण्याचा व्यवसाय सुरु करत त्यांच्या करियरला सुरुवात केली. आज हीच कंपनी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. जिचे मार्केट कॅप अंदाजे 23.09 अब्ज डॉलर इतके आहे.