Ganesh Sonawane
भोंदू अशोक खरातची फरार पत्नी कल्पना खरात विरोधात पोलिसांनी लुकआउट नोटीस जारी केली आहे.
तपास यंत्रणांकडून दिल्या जाणारी ही लुकआउट नोटीस फरार व्यक्तींसंदर्भात वापरली जाते.
वॉण्टेड म्हणजेच पोलीस ज्या व्यक्तीचा शोधात आहे, अशी व्यक्ती परदेशात कुठे पळून जाऊ नये म्हणून ही नोटीस काढली जाते.
लुकआउट नोटीसचा वापर आंतरराष्ट्रीय सीमांवर इमिग्रेशनच्या तपासणीसंदर्भात करता येतो.
या नोटीसच्या माध्यमातून फरार असणारी व्यक्ती परदेशात जाणार नाही. यासंदर्भातील सतर्कता तपास यंत्रणा किंवा पोलीस घेतात.
एखाद्या प्रकरणामध्ये तपास सुरु असताना तपासाशीसंबंधित प्रमुख संशयित आरोपी किंवा व्यक्ती देश सोडून पळून जाऊ नये यासाठी ही नोटीस जारी केली जाते.
इमिग्रेशनचे अधिकारी या नोटीसच्या आधारे आंतरराष्ट्रीय विमानतळे किंवा समुद्रकिनाऱ्यांवर संबंधित व्यक्तीला या नोटीसच्या आधारे प्रवासाला मज्जाव करु शकतात.
काही लुकआउट नोटीअंतर्गत संबंधित व्यक्ती ही तपास यंत्रणांना प्रवासासंदर्भात सर्व माहिती देऊन, त्यांची परवानगी घेऊनच प्रवास करु शकते.
तर काही प्रकारच्या नोटीशींनुसार संबंधित व्यक्तीला देश सोडण्यावर बंदी घालण्यात येते.