अमरावती, नागपुरात शेतजमीन..! भावी सरन्यायाधीश भूषण गवईंची संपत्ती किती?

Rajanand More

न्यायाधीशांची संपत्ती सार्वजनिक

सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांसह इतर न्यायाधीशांकडील संपत्तीची माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे. कोर्टाच्या संकेतस्थळावर ही माहिती उपलब्ध आहे.

Supreme Court | Sarkarnama

न्यायाधीश भूषण गवई

सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश भूषण गवई हे भावी सरन्यायाधीश आहेत. त्यांनीही आपल्या संपत्तीची माहिती सार्वजनिक केली आहे.

Justice Bhushan Gavai | Sarkarnama

अमरावतीत घर, शेती

संकेतस्थळावरील माहितीनुसार, अमरावतीमध्ये घर असून ते दिवंगत वडिलांनंतर वारसाहक्काने मिळालेले आहे. अमरावतीतच स्वत:च्या मालकीची आणि वारसाहक्काने मिळालेली शेतजमीन आहे. नागपुरातही त्यांच्या नावावर शेतजमीन आहे.

Justice Bhushan Gavai | Sarkarnama

मुंबई, दिल्लीत फ्लॅट

न्यायाधीश गवई यांचा मुंबईतील बांद्रा भागात त्याचप्रमाणे दिल्लीतील डिफेन्स कॉलनीमध्ये फ्लॅट आहे.

Justice Bhushan Gavai | Sarkarnama

शेअर्स, म्युच्यूअल फंड

मुंबईतील न्यायसागर को.ऑ. सोसायटीचे एक हजार रुपयांचे शेअर्स, इतर 31 हजार 315 रुपयांचे. पीपीएफमध्ये 6,59,692 तर जीपीएफमध्ये 35,86,736 रुपये गुंतवणूक आहे.

Justice Bhushan Gavai | Sarkarnama

दागिने किती?

न्यायाधीश गवई यांच्याकडे सुमारे सव्वा पाच लाखांचे तर पत्नीकडे 29 लाख 70 हजार रुपयांचे दागिने आहेत. पत्नीच्या दागिन्यांपैकी बहुतेक 750 ग्रॅमचे दागिने स्त्रीधन आहे.

Justice Bhushan Gavai | Sarkarnama

बँक खात्यात किती पैसे?

बँक खात्यात 19 लाख 63 हजार 584 रुपये असून त्यांच्याकडे 61 हजार 320 रुपयांची रोकड आहे. इतर अडव्हॉन्समध्ये 54 लाख 86 हजार 841 रुपये आहेत.

कार आहे का?

सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या माहितीमध्ये न्यायाधीश गवई यांच्याकडे वाहन आहे किंवा नाही, याबाबत माहिती नाही.

Justice Bhushan Gavai | Sarkarnama

NEXT : वडील भारतात केंद्रीय मंत्री अन् मुलगा पाक लष्करात अधिकारी..! युध्द सुरू होताच काय केलं पंतप्रधानांनी?

येथे क्लिक करा.