Jagdish Patil
भारताचे 52 वे सरन्यायाधीश न्यायमूर्ती बी. आर. गवई 23 नोव्हेंबर रोजी निवृत्त होणार आहेत.
आता सरकारने त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती सूर्यकांत यांची 53 वे सरन्यायधीश म्हणून नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
त्यांची नियुक्तीची औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर ते 24 नोव्हेंबर रोजी भारताचे सरन्यायधीश म्हणून शपथ घेतील.
त्यांचा कार्यकाळ 15 महिने असणार आहे. तो 9 फेब्रुवारी 2027 रोजी संपण्याची शक्यता आहे.
न्यायमूर्ती सूर्यकांत यांची न्यायालयीन कारकीर्द 4 दशकांहून अधिक काळाची आहे.
त्यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1962 रोजी हरियाणातील हिसार येथे झाला. 1981 मध्ये हिसार येथील सरकारी महाविद्यालयातून त्यांनी पदवी पूर्ण केली.
1984 मध्ये रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी त्याच वर्षी हिसारमधील जिल्हा न्यायालयात प्रॅक्टिस सुरू केली.
त्यांनी अनेक विद्यापीठे, महामंडळे, बँका आणि उच्च न्यायालयातील महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे.
9 जानेवारी 2004 रोजी पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे कायमस्वरूपी न्यायाधीश तर ऑक्टोबर 2018 रोजी हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
24 मे 2019 रोजी त्यांना सर्वोच्च न्यायालयात बढती देण्यात आली. तर 12 नोव्हेंबर 2024 पासून सर्वोच्च न्यायालयाच्या कायदेशीर सेवा समितीचे अध्यक्ष म्हणूनही काम करताहेत.