Jagdish Patil
जतमधील राजारामबापू पाटील साखर कारखान्याचे नाव काही अज्ञातांनी रात्रीत बदलल्याची घटना समोर आली आहे.
राजारामबापू पाटील नावाच्या कमानीवर 'राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना' असं नाव आता लिहिण्यात आलं आहे.
तर राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा यंदा धुराडं पेटू देणार नाही असा इशारा भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांना दिला होता.
जयंत पाटील यांच्या वडिलांचे नाव बदलल्यामुळे सांगलीच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून हे नाव कोणी बदललं याबाबत तर्क वितर्क लावले जात आहे.
तर राजारामबापूंच्या नावाच्या फलकावर ज्या राजे विजयसिंह डफळे यांचं नाव लिहिलं आहे. ते नेमके कोण होते ते जाणून घेऊया.
राजे विजयसिंह हे जत संस्थानाचे शेवटचे राजे होते. त्यांच्या नावाने अनेक संस्थांची स्थापना करण्यात आली आहे.
यामध्ये राजे विजयसिंह डफळे साखर कारखान्याचा समावेश होता.
तर श्रीमंत राजे रामराव महाराज हे विजयसिंह राजे यांचे वडील त्यांना आधुनिक जत संस्थानचे शिल्पकार असे म्हणतात.