घरात कोट्यवधींचे घबाड सापडलेले न्यायमूर्ती यशवंत वर्मा 'त्या' 3 आरोपांमुळे ठरले दोषी!

Jagdish Patil

न्यायमूर्ती

न्यायमूर्ती यशवंत वर्मा दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असताना त्यांच्या निवासस्थानी मोठ्या प्रमाणात नोटांचे गठ्ठे सापडले होते.

Justice Yashwant Varma Case

राजीनामा

मार्च 2025 मधील या प्रकरणामुळे त्यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर संसदीय चौकशी समितीने त्यांच्याविरोधात चौकशी सुरू केली.

Justice Yashwant Varma Case | Sarkarnama

समिती

ही रोकड कुठून आली, ती कोणाची होती याबाबत स्पष्ट माहिती न दिल्याच्या आधारावर समितीने वर्मा यांच्यावरील आरोप सिद्ध झाल्याचा निष्कर्ष काढला आहे.

Justice Yashwant Varma Case | Sarkarnama

ओम बिर्ला

समितीने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे सादर केलेला अहवाल 12 ऑगस्ट रोजी सभागृहात मांडण्यात आला.

अहवाल

अहवालात महत्त्वाच्या पुराव्यांमध्ये हस्तक्षेप केल्याचा ढपका ठेवत त्यांच्यावर तीन महत्त्वाचे आरोप करण्यात आले.

Justice Yashwant Varma Case

पहिला आरोप

स्टोअररूममध्ये सापडलेल्या नोटांचा कायदेशीर स्रोत काय? याचे समाधानकारक स्पष्टीकरण न्यायमूर्तींना देता आलं नाही.

Justice Yashwant Varma Case | Sarkarnama

दुसरा आरोप

त्यांनी महत्त्वाचे पुरावे जतन केले नाहीतच शिवाय त्या पुराव्यांमध्ये हस्तक्षेपदेखील केला.

Justice Yashwant Varma Case

तिसरा आरोप

न्यायमूर्ती वर्मा यांनी समितीसमोर टाळाटाळ करणारी आणि दिशाभूल करणारी स्पष्टीकरणे दिली.

Justice Yashwant Varma Case

नोटांचे गठ्ठे

समितीसमोर जबाब देताना साक्षीदारांनी स्टोअररूममधील एका कठड्यावर 500 रुपयांच्या नोटांचे गठ्ठे बघितल्याचं सांगितलं.

Justice Yashwant Varma Case | Sarkarnama

पुरावे

समितीच्या मते, वर्मा यांनी नोटा सुरक्षित ठेवण्यासाठी, पुरावे जतन करण्यासाठी कोणतीही पावले उचलली नाहीत.

Justice Yashwant Varma Case | Sarkarnama

कसूर

उलट साफसफाईच्या कामामुळे जळलेल्या नोटा गायब झाल्यामुळे समितीने याला कर्तव्यातील कसूर मानले.

Justice Yashwant Varma Case

NEXT : TCS मध्ये इंटर्न ते टाटा सन्सचे अध्यक्ष! तडकाफडकी राजीनाम्यामुळे शेअर बाजारात खळबळ

N Chandrasekaran Resigns | Sarkarnama
क्लिक करा