Jagdish Patil
'टाटा सन्स'चे अध्यक्ष असलेल्या एन. चंद्रशेखरन यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्यामुळे शेअर बाजारात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याबाबतची माहिती जाणून घेऊया.
चंद्रशेखरन हे टाटा कुटुंबातील नसतानाही टाटा समूहाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांची निवड करण्यात आली.
त्यांची एकूण संपत्ती अंदाजे 100 दशलक्ष डॉलर्स, म्हणजेच सुमारे 850 कोटी इतकी असल्याचे सांगितले जाते.
त्यांचा जन्म 1963 मध्ये तामिळनाडूतील मोहनूर येथे एका शेतकरी कुटुंबात झाला.
घरची पार्श्वभूमी शेतीची असली तरी त्यांना लहानपणापासूनच संगणक आणि प्रोग्रामिंगची आवड होती.
त्यांनी अप्लाइड सायन्सेसची पदवी घेतल्यानंतर तिरुचिरापल्ली येथील रिजनल इंजिनिअरिंग कॉलेजमधून मास्टर ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्सचे शिक्षण पूर्ण केले.
चंद्रशेखरन यांनी 1987 मध्ये TCS मध्ये इंटर्न म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी संस्थेच्या सर्वोच्च पदापर्यंत मजल मारली.
2007 साली त्यांची TCS च्या संचालक मंडळावर नियुक्ती झाली. तर 2009 मध्ये त्यांनी कंपनीचे CEO आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून सूत्रे हाती घेतली.
ऑक्टोबर 2016 मध्ये चंद्रशेखरन ‘टाटा सन्स’च्या संचालक मंडळावर आले. त्यानंतर जानेवारी 2017 मध्ये त्यांची 'टाटा सन्स'च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
टाटा कुटुंबाबाहेरील व्यक्ती म्हणून हे पद भूषवणारे ते पहिलेच व्यक्ती ठरले.