Rashmi Mane
जस्टिन ट्रुडो यांनी पहिल्यांदा 2015 मध्ये कॅनडाचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला.
तेव्हापासून आतापर्यंत कॅनडाचे पंतप्रधान राहिले आहेत. त्यांचा जन्म 25 डिसेंबर 1971 रोजी कॅनडाचे माजी पंतप्रधान पियरे ट्रूडो यांच्या कुटुंबात झाला.
कॅनडाचे पीएम ट्रूडो यांनी आपल्या करिअरची सुरुवात शिक्षक म्हणून केली होती. ते फ्रेंच आणि गणित शिकवत असे.
2008 मध्ये, जस्टिन ट्रूडो लिबरल पक्षात सामील झाले. येथूनच त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कॅनडाचे पंतप्रधान म्हणून जस्टिन ट्रूडो यांचा वार्षिक पगार $379,000 म्हणजेच अंदाजे 3.15 कोटी रुपये आहे.
ट्रुडो यांना त्यांच्या वडिलांकडून 374 कोटी रुपयांची वडिलोपार्जित संपत्ती मिळाली आहे. रिअल इस्टेटमध्येही त्यांनी गुंतवणूक केली आहे.
याशिवाय त्यांनी जागतिक कंपन्यांच्या शेअर्समध्ये सुमारे 7 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
जस्टिन ट्रुडो यांच्या संपत्तीबद्दल बोलायचे तर ते देशातील सर्वात श्रीमंत प्रमुखांपैकी एक आहेत. त्यांच्याकडे 2 नौका आहेत, ज्यांची किंमत 3 दशलक्ष डॉलर्स आहे. त्यांची एकूण संपत्ती $97 दशलक्ष म्हणजेच 806 कोटी रुपये इतकी आहे.