Ganesh Sonawane
1993 मध्ये रामदास कदम यांच्या पत्नीने जाळून घेतले होते की, त्यांना जाळले होते. ज्योती कदम यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न का केला? असा आरोप उबाठा नेते अनिल परब यांनी केला आहे.
त्यावर रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम यांनी माध्यमांसमोर येत अनिल परब यांनी केलेले आरोप फेटाळले आहेत.
अनिल परब यांनी जे आरोप केले ते फार चुकीचे असून तेव्हा असे काही झाले नव्हते असा खुलासा ज्योती कदम यांनी केला आहे.
ज्योती कदम यांनी सांगितले की, तेव्हा आम्ही इतके श्रीमंत नव्हतो की, त्यामुळे आमच्याकडे गॅस सिलेंडरच नव्हता.
मी स्टोव्हवरती स्वयंपाक करत होते, तेव्हा स्टोव्हने आधी माझा पदर जळाला, त्यानंतर ही घटना घडली होती.
मला वाचवताना त्यांचे (पती रामदास कदम यांचे) हात देखील भाजले होते, मला त्यांनी रूग्णालयात नेलं.
मला वाचवण्यासाठी बाहेर देशात उपचारासाठी नेले होते, हे आरोप चुकीचे आहेत.
आम्हाला बदनाम करू नका, फार त्रास होतो आहे. मी पहिल्यांदा मी मिडियासमोर आल्याचे त्यांनी सांगितले.