Ganesh Sonawane
रामदास कदम यांनी २०२२ मध्ये शिवसेना नेते पदाचा राजीनामा देत उद्धव ठाकरेंची साथ सोडली होती.
त्यावेळी कदम यांनी उद्धव ठाकरेंना राजीनामा पत्र लिहून आपली नाराजी कळवली होती. त्यात त्यांनी काय लिहलं होतं ते पाहूया..
शिवसेना प्रमुखांचे निधन झाल्यानंतर नेते पदाला कुठलीही किंमत राहीली नाही, हे मला पहायला मिळाल्याची खदखद कदमांनी व्यक्त केली होती.
मला व माझा मुलगा आमदार योगेश कदम याला उद्धव ठाकरेंनी अनेक वेळा अपमानीत केल्याचं कदम यांनी पत्रात लिहलं होतं.
उद्धव ठाकरेंनी कदम यांना मातोश्रीवर बोलवून घेत आदेश दिले होते की, तुम्ही यापुढे पक्षाशी संबधित कोणतेही वक्तव्य मिडीयासमोर अजिबात करायचे नाही.
तुमच्यावरती कोणीही कितीही टीका केली किंवा पक्षावर काही बोलले किंवा मातोश्रीवर कोण काही बोललं तरी आपण मिडीयासमोर अजिबात जायचे नाही असे आदेश उद्धव ठाकरेंनी कदमांना दिले.
२०१९ साली राष्ट्रवादी आणि काँग्रेस सोबत युती करु नका असं रामदास कदमांनी उद्धव ठाकरेंना विनंती केली पण त्यांनी ऐकलं नाही.
बाळासाहेब ठाकरे यांनी आयुष्यभर राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत संघर्ष केला व हिंदुत्व टिकवलं त्यामुळे त्यांच्यासोबत युती नको असं कदमांचे म्हणणे होते.
शिवसेना प्रमुख असते तर माझ्यावर ही वेळ आली नसती. आणि म्हणून मी आज "शिवसेना नेता" पदाचा राजीनामा देत आहे असं कदमांनी पत्रात लिहलं होतं.