सुपरकॉप ते भाजपचा हिंदुत्ववादी चेहरा; पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत?

Rajanand More

के. अण्णामलाई

तामिळनाडू भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष के. अण्णामलाई हे पक्षाला रामराम ठोकण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. पदावरून हटविल्यापासून ते पक्षात नाराज असल्याचे सांगितले जात आहे.

K Annamalai | Sarkarnama

शहांची भेट

अण्णामलाई यांनी दिल्लीत मंगळवारी (ता. २) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेत चर्चा केली.

K Annamalai | Sarkarnama

पोस्टरबॉय

अण्णामलाई यांना तमिळनाडूमध्ये भाजपचे पोस्टरबॉय म्हणून ओळखले जाते. राज्यात भाजपची ताकद वाढविण्यात त्यांचा मोठा हातभार असल्याचे मानले जाते.

K. Annamalai | Sarkarnama

सुपरकॉप

अण्णामलाई हे माजी आयपीएस अधिकारी आहेत. २०११ मध्ये कर्नाटक केडरमधून या सेवेत आहे. सुमारे आठ वर्षे त्यांनी विविध पदांवर काम करत धडाकेबाज अधिकारी म्हणून ओळख बनविली.

K Annamalai | Sarkarnama

राजीनामा अन् राजकारण

२०१९ मध्ये त्यांनी IPS सेवेतून राजीनामा दिला. त्यानंतर काही महिन्यांतच २०२० मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाने लगेच त्यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली.

K. Annamalai | Sarkarnama

हिंदुत्ववादी चेहरा

प्रदेशाध्यक्ष पद मिळाल्यानंतर अण्णामलाई हे द्रविड राजकारणाच्या बालेकिल्ल्यात हिंदुत्व आणि भाजपचा प्रभावी चेहरा म्हणून उदयास आले.

K. Annamalai | Sarkarnama

एआयडीएमकेला विरोध

एआयडीएमके या पक्षाशी आघाडी करण्याचा त्यांचा विरोध कायम आहे. त्यावरूनच त्यांना विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी प्रदेशाध्यक्ष पदावरून हटविण्यात आले.

K annamalai | Sarkarnama

पक्षात नाराजी

अण्णामलाई यांना हटविल्याने पक्षातील एक गटही नाराज असल्याचे सांगितले जाते. आता ते खरंच भाजप सोडणार का, याबाबत दक्षिणेतील राज्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

K. Annamalai | Sarkarnama

NEXT : CM झाल्याशिवाय दाढी करणार नाही! तुरुंगात असतानाच घेतली होती शपथ

येथे क्लिक करा.