Rajanand More
भाजपच्या नगरसेविका मंजुषा नागपुरे या पुण्याच्या महापौर असतील. भाजपने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यानंतर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
भाजपकडे बहुमत असल्याने नागपुरे यांची निवड निश्चित आहे. निवडणुकीमध्ये त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
नागपुरे या उच्चशिक्षित असून राजकारणात येण्यापूर्वी त्या एका आयटी कंपनीत नोकरी करत होत्या. आता त्या महापौर होणार आहेत.
मंजुषा नागपुरे आणि त्यांचे पती कट्टर हिंदुत्ववादी म्हणून ओळखले जातात. दोघेही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत.
नागपुरे यांची नगरसेवकपदाची तिसरी टर्म आहे. नोकरीचा राजीनामा देत त्यांनी २०१२ मध्ये पहिली आणि २०१७ मध्ये दुसऱ्यांदा निवडणूक लढविली होती.
नागपुरे कुटूंब अनेक वर्षांपासून भाजपशी एकनिष्ठ मानले जाते. मंजुषा नागपुरे या शहर भाजपच्या उपाध्यक्षा होत्या. तर दीपक नागपुरे हे सरचिटणीस होते.
महापौरपदासाठी नाव जाहीर होताच मंजुषा नागपुरे यांना मीडियाशी बोलताना दिवंगत अजित पवार यांची आठवण झाली.
नागपुरे म्हणाल्या, माजी तीव्र इच्छा होती की अजितदादांची शिस्त आणि कामाची पध्दत पाहता त्यांच्यासोबत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायचे होते.