Mangesh Mahale
माजी एटीएस प्रमुख के.पी. रघुवंशी सध्या त्यांच्या 'ट्रबलशूटर' या पुस्तकामुळे चर्चेत आले आहेत.
या पुस्तकात रघुवंशी यांनी त्यांच्या 35 वर्षांच्या कारकिर्दीतील अनेक गोप्यस्फोट केले आहे.
1980 च्या बॅचचे अधिकारी असलेल्या रघुवंशी यांनी त्यांच्या 35 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक महत्त्वाच्या विभागांचे नेतृत्व केले.
मुंबई दंगलीवरील श्रीकृष्ण आयोगाच्या अहवालाची अंमलबजावणी करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.
विशेष कार्य दल (STF), महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक (ATS) आणि ठाणे पोलीस आयुक्तलयाचा स्थापनेत मौलाचा वाटा
गडचिरोलीतील नक्षलविरोधी विशेष 'सी-60' फोर्स स्थापन करण्याचे श्रेयही रघुवंशी यांना दिले जाते.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरएसएसचे इंद्रेश कुमार यांना अटक करण्यासाठी सांगितले होते, असे त्यांनी म्हटले आहे.
मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात बाळासाहेब ठाकरे यांना अटक करण्यासाठी दबाव होता, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.