Sachin Waghmare
धाराशिव-कळंबचे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांचा आज वाढदिवस आहे.
कैलास पाटील यांनी २०१७ सालच्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले होते.
एकेकाळी त्यांची आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे खंदे समर्थक अशी ओळख होती.
२०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकीत राणा पाटलांनी खंद्या समर्थकाऐवजी दुसऱ्याला उमेदवारी दिली त्यामुळे कैलास पाटील नाराज झाले होते.
कैलास पाटील यांना जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळाली. दीड हजाराहून अधिक मतांनी निवडूनही आले.
ओमराजे यांनी त्यावेळी दाखवलेला विश्वास पाटील यांच्यासाठी त्यांच्या राजकीय कारकीर्दीसाठी महत्वाचा ठरला. राजकारणातील गाॅडफादर खासदार ओम राजेनिंबाळकर यांना मानतात.
कैलास पाटील यांनी थेट विधानसभेची उमेदवारी मिळवली अन धाराशिव -कळंब मतदारसंघाचे आमदार झाले. सहा वर्षातील हा वेगवान राजकीय प्रवास अनेकांसाठी प्रेरणादायी आहे.
उस्मानाबादचे शिवसेना (ठाकरे गटाचे) खासदार ओमराजे निंबाळकर आणि धाराशिव-कळंबचे आमदार कैलास पाटील यांची राजकारणातील जोडी सेनेतील फाटाफुटीनंतर कायम आहे.
जिल्ह्यात ठाकरे गटाची ताकद पक्ष फुटीनंतरही कायम आहे, त्याला या दोघांमधील समन्वय आणि समजुतदारपणा कारणीभूत असल्याचे बोलले जाते.