Roshan More
UPSC परीक्षा पास होत अधिकारी होण्याचे लाखो विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. मात्र, काहीच विद्यार्थी हे स्वप्न पूर्ण करू शकतात. त्यातील एक नाव म्हणजे काजल जावला.
उत्तर प्रदेशातील शामली येथील रहिवासी काजल जावला यांच्या वडिलांच्या इच्छा होती की काजल यांनी स्पर्धा परीक्षांची तयारी करत अधिकारी व्हावे.
काजल यांनी मथुरामधील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातून बीटेक पूर्ण केले.विप्रो कंपनीत त्यांना नोकरी मिळाली जिथे त्यांना तब्बल 23 लाखांचे वार्षिक पॅकेज होते.
काजल यांनी UPSC ची तयारी करण्यासाठी 23 लाखांचे पॅकेज असणारी त्यांनी नोकरी सोडली.
UPSC परीक्षा देत असताना काजल या तब्बल चार वेळा नापास झाल्या.
काजल यांचा विवाह आशिष मलिक यांच्याशी झाला. ते अमेरिकन एम्बसीमध्ये कार्यरत आहेत. काजल यांनी लग्नानंतर देखील UPSC ची तयारी सुरूच ठेवली.
काजल यांना UPSC ची तयारी करायला पती आशिष यांनी प्रोत्साहन दिले. त्या 2018 मध्ये 28 वा क्रमांक मिळवत IAS अधिकारी झाल्या.