राज्यसेवा परीक्षेत टॉपर, आता लाच घेताना अटक; कोण आहेत ‘या’ महिला अधिकारी?

Rajanand More

काजल मीणा

काजल मीणा या महिला अधिकाऱ्याची सध्या देशभर चर्चा होत आहे. सरकारी सेवेत येण्याआधी लोकांची सेवा करण्याविषयी मोठमोठी विधाने करणाऱ्या काजल सध्या तुरूंगात आहेत.

Kajal Meena | Sarkarnama

SDM

राजस्थानमधील करौली येथे उपविभागीय दंडाधिकारी (SDM) म्हणून कार्यरत असलेल्या काजल मीणा यांना नुकतीच लाच प्रकरणात रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

Kajal Meena | Sarkarnama

जमीन प्रकरण

एका जमीन प्रकरणात काजल यांनी एक लाख रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे आली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला होता.

Corruption | Sarkarnama

रीडर मध्यस्थ

काजल यांनी रीडरमार्फत 60 हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यासाठी एसीबीकडून कार्यालयातच सापळा रचला गेला. यामध्ये ते अडकले. त्यानंतर मीणा यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली.

Kajal Meena | Sarkarnama

टॉपर 

काजल मीणा या राजस्थान प्रशासकीय सेवेतील २०२४ च्या तुकडीतील अनुसूचित जमाती गटातील टॉपर आहेत. त्यानंतर झालेली पहिली नियुक्ती त्यांनी नाकारली होती.

Kajal Meena | Sarkarnama

उच्चशिक्षित

मंडी आयआयटीमधून त्यांनी इलेक्टॉनिक इंजिनिअरींग शाखेतून पदवी मिळविली आहे. त्यानंतर त्यांनी शासकीय सेवेत येण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते.

Kajal Meena | Sarkarnama

केंद्र सरकार

राजस्थान राज्यात रुजू होण्याआधी त्यांनी केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्येही कामम केले आहे. त्यामध्ये दिल्ली दूरसंचार, ईपीएफओ आदी विभागांचा समावेश आहे.

Kajal Meena | Sarkarnama

निलंबित

अटकेच्या कारवाईनंतर काजल यांना सेवेतून तातडीने निलंबित करण्यात आले आहे. प्रशासनात येऊन चांगले बदल घडविण्याबाबतचा त्यांचा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Kajal Meena | Sarkarnama

NEXT : महाराष्ट्र प्रशासनात ‘क्लास वन’चा दर्जा; महिन्याला कमवा 61 हजार 500 रुपये, तातडीनं करा अर्ज...

येथे क्लिक करा.