महाराष्ट्र प्रशासनात ‘क्लास वन’चा दर्जा; महिन्याला कमवा 61 हजार 500 रुपये, तातडीनं करा अर्ज...

Rajanand More

मुख्यमंत्री फेलोशिप

महाराष्ट्र सरकारकडून तरूणांसाठी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत तरुणांना राज्याच्या प्रशासनात काम करण्याची संधी मिळणार आहे.

Devendra Fadnavis | Sarkarnama

निवडीचे निकष

कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि किमान गुण ६० टक्के आवश्यक. तसेच किमान एक वर्षांचा पूर्णवे कामाचा अनुभव आवश्यक असेल.

CM Fellowship | Sarkarnama

वयोमर्यादा

उमेदवारचे वर्य अर्ज सादर करावयाच्या अंतिम दिनांकास किमान २१ वर्षे व कमाल २६ वर्षे असायला हवे. केवळ तरूणांनाच संधी मिळणार आहे.

CM Fellowship | Sarkarnama

अर्ज कसा करावा?

राज्याच्या अर्थ व सांख्यिकी संचालनालयाद्वारे विहीत केलेल्या ऑनलाईन अप्लिकेशन प्रणालीद्वारेच अर्ज करावयाचा आहे. त्यासाठी ५०० रुपये शुल्क आकारले जाईल.

CM Fellowship | Sarkarnama

फेलोंची संख्या

फेलोंची संख्या ६० एवढी निश्चित करण्यात आली आहे. त्यापैकी महिला फेलोंची संख्या फेलोंच्या एकूण संख्येच्या १/३ असेल. महिला उपलब्ध न झाल्यास त्याऐवजी पुरूष फेलोंची निवड केली जाईल.

CM Fellowship | Sarkarnama

विद्यावेतन व दर्जा

फेलोशिपसाठी निवड झालेल्या उमेदवारांना महिना एकूण ६१ हजार ५०० रुपये एवढे विद्यावेतन मिळेल. या फेलोंचा दर्जा शासकीय सेवेतील गट-अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष असेल.

Maharashtra Government

कालावधी

फेलोशिप कार्यक्रमासाठी नियुक्तीचा कालावधी १२ महिन्यांचा असेल. त्यामध्ये वाढ करण्यात येणार नाही. फेलो रुजू झाल्याच्या दिनांकापासून १२ महिन्यांची त्याची नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल.

Job Interview | Sarkarnama

निवड कशी?

अर्ज केलेल्या उमेदवारांची ऑनलाईन वस्तुनिष्ठ चाचणी परीक्षा होईल. त्यातून सर्वाधिक गुण मिळालेल्या २१० उमेदवारांच्या मुलाखतीतून अंतिम ६० जण निवडले जातील. 

Online Exam | Sarkarnama

NEXT : माजी मुख्यमंत्र्यांची सून अन् विद्यमान CM च्या पत्नी, दोघींमुळे विधानसभा निवडणुकीत धुराळा...

येथे क्लिक करा.