Kajal Nishad : योगींच्या बालेकिल्ल्यात अखिलेश यांनी अभिनेत्रीला दिलं लोकसभेचं तिकीट; कोण आहे काजल?

Rashmi Mane

समाजवादी पक्षाने उमेदवारांची यादी केली जाहीर

लोकसभा निवडणूक 2024 ची तयारी जोरात सुरू आहे. अशा परिस्थितीत 30 जानेवारी 2024 रोजी समाजवादी पक्षाने 16 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली.

Kajal Nishad | Sarkarnama

काजल निषाद

या यादीत काजल निषाद यांच्या नावांचा समावेश आहे.

Kajal Nishad | Sarkarnama

योगी आदित्यनाथांच्या बालेकिल्ल्यात उमेदवारी

यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा बालेकिल्ला असलेल्या गोरखपूरमधून सपाने त्यांना उमेदवारी दिली आहे.

Kajal Nishad | Sarkarnama

मनोरंजन विश्वातून आलेली काजल निषाद कोण आहे?

राजकारणासोबतच काजल निषाद मनोरंजन क्षेत्रातही सक्रिय आहे. 'लपतागंज' सारख्या कॉमेडी शोमध्ये तसेच अनेक भोजपुरी चित्रपटांमध्येही त्यांनी आपली छाप सोडली आहे.

Kajal Nishad | Sarkarnama

चित्रपटसृष्टीत काम

काजल निषादचा जन्म गुजरातमधील कच्छ येथे झाला. पण करिअरसाठी त्या मुंबईत आल्या आणि चित्रपट आणि शोमध्ये काम सुरु केलं.

Kajal Nishad | Sarkarnama

भोजपुरी चित्रपट

2009 मध्ये त्यांनी 'लपतागंज' शोमध्ये 'चमेली' या भूमिकेतून करिअरला सुरुवात केली. यानंतर भोजपुरी चित्रपटात त्यांनी काम केलं आहे.

Kajal Nishad | Sarkarnama

काँग्रेस पक्षातून सुरुवात

काजल यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीला काँग्रेसमधून सुरुवात केली. 2012 मध्ये त्यांनी काँग्रेसच्या तिकीटावर यूपी विधानसभा निवडणूक लढवली होती ज्यात त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.

Kajal Nishad | Sarkarnama

समाजवादी पक्षात प्रवेश

2021 मध्ये काजल निषाद यांनी अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात प्रवेश केला.

Kajal Nishad | Sarkarnama

Next : साऊथचा 'सुपरस्टार' होणार 'लीडर'; थलपती विजयची राजकारणात एन्ट्री

येथे क्लिक करा