Jagdish Patil
ऐन स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर कल्याणमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
कारण ठाकरेंच्या शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे आज भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.
म्हात्रे यांच्यासोबत ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक पदाधिकारी देखील भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे.
तर ठाकरेंची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश करणारे दिपेश म्हात्रे कोण आहेत ते जाणून घेऊया.
दिपेश म्हात्रे हे वयाच्या 23 व्या वर्षी शिवसेनेत दाखल झाले.
त्यांनी रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात दोनदा विधानसभा निवडणूक लढवली होती.
2009 साली पहिल्यांदाच ते बिनविरोध नगरसेवक झाले.
2022 पर्यंत शिवसेनेत काम करून त्याचवर्षी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला.
मात्र, नोव्हेंबर 2024 मध्ये ते पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत परतले. त्यानंतर आता ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.