Rashmi Mane
लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने शिल्लक आहेत आणि तामिळनाडूमधील सर्व राजकीय पक्ष युतीसाठी चर्चेत व्यस्त आहेत.
त्यातच मक्कल नीती मैयमचे (MNM) प्रमुख कमल हसन इंडिया आघाडीत समाविष्ट होऊ शकतात, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती.
पण या चर्चांना कमल हसन यांनी आज पूर्णविराम दिला आहे. मक्कल नीधी मैम (MNM), जे म्हणजेच "पीपल्स जस्टिस सेंटर" या पक्षाची स्थापना 21 फेब्रुवारी 2018 ला कमल हसन यांनी केली होती.
"मी आधीच सांगितले आहे, की पक्षीय राजकारणापासून वर उठून देशाचा विचार करण्याची ही वेळ आहे."
'जो कोणी देशाबद्दल नि:स्वार्थपणे विचार करेल, माझा MNM त्याचा एक भाग असेल.'' पण ते म्हणाले की, MNM 'स्थानिक सरंजामी राजकारण' करणाऱ्या पक्षांशी हातमिळवणी करणार नाही.
या वक्तव्यामुळे स्पष्ट झाले आहे, की त्यांचा पक्ष इंडिया आघाडीत सामील होणार नाही.
आपल्या पक्षाच्या सातव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
R