Rashmi Mane
पाकिस्तानच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालात कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही.
आता पाकिस्तान मुस्लिम लीग नवाज (पीएमएल-एन) आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांनी मिळून केंद्रात सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
नवाज यांची मुलगी मरियम नवाज या पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्रिपदाच्या दावेदार आहेत. जाणून घेऊया त्यांच्याबद्दल...
त्यांनी पंजाब विद्यापीठातून पदवी आणि त्याच विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
मरियम यांनी 2012 मध्ये अधिकृतपणे राजकारणात प्रवेश केला. मरियम या नवाज शरीफ यांच्या जवळच्या सल्लागारांपैकी एक आहेत.
2012 मध्ये पीएमएल-एन पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांनी नवाज शरीफ यांच्या निवडणूक प्रचाराची जबाबदारी घेतली.
मरियम यांनी केलेल्या प्रचारामुळे 2013 च्या निवडणुकीत पीएमएल-एन विजयी झाले.
342 सदस्यांच्या नॅशनल असेंब्लीमध्ये पक्षाने 166 जागा जिंकल्या आणि नवाज शरीफ तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले.
R