Rajanand More
कमला प्रसाद बिसेसर या त्रिनिदाद आणि टोबॅगो या देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान आहेत. पहिल्यांदा 2010 मध्ये त्यांच्या गळ्यात पंतप्रधान पदाची माळ पडली होती.
कमला प्रसाद यांचा जन्म त्रिनिदादमध्ये झाला असला तरी त्यांचे वंशज हे मुळचे बिहारमधील बक्सर भागातील आहेत. राम लखन मिश्रा हे 1889 मध्ये हे मजूर म्हणून त्रिनिदादमध्ये आले आणि स्थायिक झाले. कमला या त्यांच्याच वंशज आहेत.
त्रिनिदादमधील लोकसंख्येपैकी तब्बल 45 टक्के लोक हे बिहार आणि उत्तर प्रदेशातील भोजपूरी असल्याचे सांगितले जाते. या देशाची लोकसंख्या केवळ 13 लाख एवढी आहे. जी गोव्यापेक्षा कमी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्रिनिदादच्या दौऱ्यावर असताना त्यांनी कमला प्रसाद यांचा उल्लेख बिहारची मुलगी असा केला. त्यामुळे त्या प्रकाशझोतात आल्या आहेत. त्यांची चर्चा संपूर्ण भारतभर होत आहे.
कमला प्रसाद या त्रिनिदादमधील युनायटेड नॅशनल काँग्रेसच्या नेत्या असून त्यांच्या पक्षाचा 2025 च्या निवडणुकीत विजय झाला आहे. त्यामुळे 2010 नंतर यावेळी दुसऱ्यांना कमला या देशाच्या पंतप्रधान बनल्या आहेत.
70 वर्षांच्या कमला प्रसाद या 38 वर्षांपासून राजकारणात आहेत. 1994 मध्ये त्या पहिल्यांदा संसदेत पोहचल्या. त्यानंतर त्यांचे राजकीय करिअर बहरतच गेले. सिपारिया या मतदारसंघाचे त्या प्रतिनिधित्व करतात.
पंतप्रधान होण्यापूर्वी कमला या दोनदा विरोधी पक्षनेत्याही होत्या. अटर्नी जनरल, शिक्षण मंत्री, कायदा मंत्री अशा अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्याही त्यांनी पार पाडल्या आहेत.
कमला प्रसाद उच्चशिक्षित असून त्यांनी वकील म्हणून आपल्या करिअरला सुरूवात केली होती. बीए, एलएलबी, एमबीए अशा पदव्या त्यांनी प्राप्त केल्या आहेत.