Jagdish Patil
भाजप खासदार कंगना रनौत या त्यांच्या स्पष्ट आणि अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत असतात.
नुकतंच त्यांनी 'Gen Z' पीढी गटरछाप असून त्यांची भाषा मला किळसवाणी वाटते, असं कंगना यांनी म्हटलं आहे.
त्यांच्या या वक्तव्यामुळे नवा वाद सुरू झाला असून याच पार्श्वभूमीवर कंगना यांच्याबाबतची माहिती जाणून घेऊया.
कंगना यांचा जन्म २३ मार्च १९८६ रोजी हिमाचल प्रदेश, भांबला, जिल्हा मंडी इथे झाला. त्यांचे वडील व्यावसायिक तर आई शिक्षिका होती.
सुरुवातीला कंगना यांनी डॉक्टर व्हाव अशी कुटुंबीयांची इच्छा होती. परंतु त्यांनी अभिनयाची वाट निवडली.
त्या मॉडेलिंग आणि थिएटरसाठी त्या दिल्लीला गेल्या आणि नंतर मुंबईत दाखल झाल्या.
२००६ मध्ये अनुराग बासू यांच्या 'गँगस्टर' या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
त्यांनतर त्यांनी 'क्वीन', 'तनु वेड्स मनु रिटर्न्स' चित्रपट केले जे लोकप्रिय झाले. या चित्रपटांसाठी त्यांना 'सर्वोत्कृष्ट अभिनेत्री'चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
त्यांनी 'मणिकर्णिका फिल्म्स' या निर्मिती संस्थेची स्थापना केली आणि 'इमर्जन्सी' या चित्रपटाचे दिग्दर्शन व अभिनय केला.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या तिकिटावर हिमाचल प्रदेशातील मंडी मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजय झाल्या.
सध्या मंडी मतदारसंघाच्या खासदार म्हणून कार्यरत असून संसदेत त्या विविध विषयांवर ते परखड भाष्य करत असतात.