Jagdish Patil
CJP च्या आंदोलनादरम्यान PM नरेंद्र मोदी यांनी २३ जुलैच्या मध्यरात्री एक व्हिडिओ पोस्ट केला होता.
या व्हिडिओतून त्यांनी पेपरफुटी करणाऱ्यांना सरकार सोडणार नाही हे सांगत कारवाईचं आश्वासन दिलं होतं.
हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. मात्र हा व्हिडिओ फेसबुकने हटवल्यामुळे एकच खळबळ उडाली.
मोदी समर्थकांनी फेसबुकवर टीकेची झोड उठवली, त्यांना व्हिडिओ हटवण्याचा अधिकार कुणी दिला असा सवालही उपस्थित केला.
या सर्व गदारोळानंतर फेसबुकने आता PM मोदींचा तो व्हिडीओ रिस्टोअर केला आहे.
दरम्यान, आता या प्रकरणी फेसबुकची कंपनी मेटाने स्पष्टीकरण देत दिलगिरी व्यक्त केली आहे.
तांत्रिक बिघाडामुळे हा व्हिडीओ काही वेळासाठी हटवला गेला. मात्र, कुठल्याही उद्देशाने किंवा हेतुपुरस्सर हा व्हिडीओ हटवला नसल्याचं मेटाने सांगितलं.
मात्र, केंद्र सरकारने या प्रकरणी मेटा आणि इन्स्टाग्रामच्या ग्लोबल प्रमुखांना समन्स धाडलं आहे.
हा व्हिडीओ जाणीवपूर्वक हटवला की यामागे तांत्रिक कारण आहे? याचा तपास आम्ही करतोय, असं सरकारने सांगितलं.