Rajanand More
कंगना रनौत या प्रसिध्द अभिनेत्री असून हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघाच्या भाजपच्या खासदारही आहेत. त्यांच्या विधानामुळे त्या सतत चर्चेत असतात.
एका मुलाखतीदरम्यान त्यांनी आपल्या सरकारी वेतनावरून केलेल्या विधानामुळे चर्चेत आल्या आहेत. त्यामुळे त्यांना नेमके वेतन किती मिळते आणि कुठे खर्च होतो, याची चर्चा सुरू झाली आहे.
सरकारकडून जेवढे वेतन मिळते, त्यापेक्षा खूप जास्त खर्च होत असल्याचा दावा कंगना यांनी मुलाखतीत केला आहे.
कुक आणि ड्रायव्हरचे वेतन दिल्यानंतर सरकारी वेतनातील केवळ 50 ते 60 हजार रुपये उरतात, असे विधान कंगना यांनी केले आहे.
या विधानामुळे कंगना यांनी सरकारी वेतन किती मिळेत, कोणकोणत्या सुविधांसाठी सरकारकडून पैसा खर्च केला जातो, याची चर्चा होत आहे.
कंगना यांना लोकसभा मतदारसंघासाठी भत्ता स्वरुपात दरमहा 70 हजार रुपये मिळतात. त्याचप्रमाणे ऑफिस खर्चासाठी 60 हजार रुपये भत्ता दिला जातो.
खासदार म्हणून त्यांनी अनेक प्रकारच्या सोयी-सुविधा मिळत असतात. त्यामध्ये मोफत आरोग्य सुविधाही आहेत. त्याचप्रमाणेच रोजच्या इतर खर्चासाठी अतिरिक्त 2 हजार रुपये भत्ता सरकारकडून दिला जातो.
केवळ वेतन आणि ऑफिस खर्चासाठीचा भत्ता धरून कंगना यांना दरमहा सव्वा लाखांहून अधिक पैसे सरकारकडून मिळतात.