Rashmi Mane
अभिनेत्री आणि खासदार कंगना रनौत त्यांच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात.
त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे राजकीय क्षेत्रात अनेक वेळा वाद निर्माण झाले आहेत. आता अशाच एका वक्तव्यामुळे कंगना रनौत पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.
कंगना रनौत यांनी शेतकरी आंदोलनाबाबत पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी शेतकरी आंदोलनामुळे पंजाबची स्थिती बांग्लादेशसारखी झाली असती, असे विधान केले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत असून त्यावरून वाद निर्माण झाला आहे.
1) केंद्र सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनादरम्यान कंगना रनौत यांनी पंजाबमधील 80 वर्षीय महिला शेतकऱ्याची बिल्किस बानो म्हणून चुकीची ओळख करून दिली होती.
2021 मध्ये एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत कंगना रनौत म्हणाल्या होत्या की, 'भारताला 1947 मध्ये भीक मागून स्वातंत्र्य मिळाले, देशाला खरे स्वातंत्र्य 2014 साली मिळाले.' त्यांच्या या विधानानंतर संपूर्ण देशात नव्या वादाला तोंड फुटले होते तसेच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.
या वर्षी जुलै महिन्यात संसदेच्या अधिवेशनादरम्यान विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शिव आणि महाभारताच्या कथेतील चक्रव्यूहाचा उल्लेख केला होता. यानंतर कंगना रानौत यांनी राहुल गांधींवर टीका करताना म्हटले की, 'ते ज्या पध्दतीचे वक्तव्य करतात त्यावरून ते ड्रग्स घेतात का, याची चौकशी व्हायला हवी.' असे विधान केले होते.
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांची सत्ता असताना मुंबई महानगरपालिकेने (BMC) कंगनाच्या घराचा काही भाग बेकायदेशीर ठरवून बुलडोझर लावला होता. यावरून कंगना यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला होता.