Kanshi Ram : महाराष्ट्र सोडून गेले अन् सर्वात मोठ्या राज्यात सत्ता आणली! चार वेळा मुख्यमंत्री बनवणाऱ्या नेत्याचा प्रवास

सरकारनामा ब्यूरो

दलित राजकारणाचे किंगमेकर

पंजाबमध्ये जन्मलेले उत्तर प्रदेशामध्ये तब्बल चार वेळा सत्ता आणणारे कांशीराम यांची आज (15 मार्च) जयंती आहे. दलित राजकारणाचे किंगमेकर म्हणून ते ओळखले जातात.

सरकारी नोकरी सोडली

कांशीराम हे केंद्र सरकारमध्ये नोकरीला होते. पुण्यामध्ये ते नोकरी करत होते. मात्र, सामाजिक परिवर्तनाच्या लढ्यात सहभागी होत त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला.

Kanshi Ram Political Journey BSP | sarkarnama

महाराष्ट्र सोडला

कांशीराम यांनी सुरुवातीच्या काळात महाराष्ट्राच्या राजकारणात परिवर्तनाचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

Kanshi Ram Political Journey BSP | sarkarnama

उत्तर प्रदेश कर्मभूमी

उत्तर प्रदेशला त्यांनी आपली कर्मभूमी बनवले. बहुजन समाजवादी पक्षाची त्यांनी स्थापना केली.

Kanshi Ram Political Journey BSP | sarkarnama

आठ वर्षात सत्ता

पक्षाच्या सत्ता स्थापनेनंतर अवघ्या आठ वर्षांत उत्तर प्रदेशमध्ये त्यांची सत्ता आली. आणि मायावती या पहिल्या दलित मुख्यमंत्री बनल्या.

Kanshi Ram Political Journey BSP | sarkarnama

दलित राजकारण

उत्तर प्रदेशमध्ये दलितांची संख्या 21 टक्के आहे. जेवढे ज्यांची संख्या तेवढी त्यांचा सत्तेत वाटा, अशी घोषणा देत त्यांनी दलित, बहुजन, मागासवर्गीयांचे राजकारण त्यांनी केले.

Kanshi Ram | Sarkarnama

चार वेळा सत्ता

उत्तर प्रदेशमध्ये कांशीराम यांच्या नेतृत्वात बसपाची सत्ता आली. चारही वेळा मायावती मुख्यमंत्री झाल्या.

Kanshi Ram | Sarkarnama

उत्तराधिकारी

कांशीराम यांनी आपल्या उत्तराधिकारी म्हणून मायावती यांचे नाव जाहीर केले होते. आता त्या बसपाच्या प्रमुख आहेत.

Mayawati And Kanshi Ram | Sarkarnama

NEXT : शिवसेनेच्या फायरब्रँड नेत्या, खासदार ज्योती वाघमारे किती कोटींच्या मालकीण आहेत?

Jyoti Waghmare Networth
येथे क्लिक करा