Mangesh Mahale
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्योती वाघमारेंना राज्यसभेवर पाठवले आहे. त्याची संपत्ती किती जाणून घेऊया
वाघमारेंनी अर्ज भरताना निवडणूक आयोगाला त्यांच्याकडे एकुण संपत्ती किती आहे? याची माहिती सांगितली आहे.
त्यांच्याकडे 5,78,088 रुपयांची जंगम मालमत्ता असून 32,74,000 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
14,10,000 रुपयांची वारसाप्राप्त संपत्ती आणि 33,60,000 रुपयांची स्वसंपादित मालमत्ता नावावर आहे.
63 हजारांची रोख रक्कम असून 27,74,000 किंमतीची शेतजमीन देखील आहे. 27,40,564 रुपयांचं कर्ज आहे.
२,५२,१०० किंमतीचं १७ ग्रॅम सोनं, १७,२४४ रुपयांची ४१ ग्रॅम चांदीचे दागिने आहेत.
९५,००० रुपयांची सुझुकी कंपनीची बर्गमन स्ट्रीट गाडी वाघमारेंच्या नावे आहे.
एकूण संपत्तीचा विचार केला तर त्या 1 कोटी 41 लाख 99 हजार 652 रुपये एवढ्या प्रॉपर्टीच्या मालकीण आहेत.
आपल्यावर कोणताही फौजदारी स्वरुपाचा गुन्हा नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे.